प्रॉपर्टी घेताना फसवणूक होऊ नये म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे – 16pur.com
सोलापूर शहरात किंवा जिल्ह्यात जर तुम्ही प्लॉट, जमीन, शेती किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करत असाल, तर खालील सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण सध्या एकाच प्लॉटचे किंवा जमिनीचे खरेदीखत अनेक लोकांशी करून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. म्हणून 16pur.com तुम्हाला एक सल्ला देतो, की खरेदी करण्याआधी खालील गोष्टी नीट तपासा.
1. विक्रेत्याची ओळख (Identity of the Seller)
- विक्रेता कोण आहे? त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड पाहा.
- त्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर आहे का?
- जर नाही असेल, तर त्याच्या नावावर खरेदीखत झाले आहे का?
2. ७/१२ उतारा (7/12 Extract)
- मूळ मालक कोण आहे?
- बँकेचे कर्ज आहे का?
- फेरफार झाला आहे का?
- अन्य कोणी हक्क मागितला आहे का?
3. फेरफार (Mutation Entry)
- ही प्रॉपर्टी वारशाने मिळाली आहे का?
- की खरेदीखताने मिळाली आहे?
4. मोजणी नकाशा आणि चतु:सी सीमा (Measurement Map and Boundaries)
- प्लॉटचा मोजणी नकाशा मिळवावा.
- त्यावर प्लॉटची चतु:सी सीमा असते.
- किती स्क्वे.फूट आहे हे नकाशावरून तपासावे.
5. प्रॉपर्टी कार्ड (Property Card)
- भोगवटादाराचे नाव, मालकाचे नाव आणि शासकीय नोंद असते.
- शहरी भागासाठी हे महत्त्वाचे आहे.
6. खरेदीखत (Sale Deed)
- विक्रेत्याच्या नावाने जुने खरेदीखत आहे का?
- खरेदीखतावरील स्क्वे.फूट आणि ७/१२ वरचा स्क्वे.फूट एकसारखा आहे का?
7. मिळकतकर आणि मालमत्ता कर (Property and Municipal Tax)
- चालू कर कोण भरतो?
- त्याच नावाने बिल आहे का?
8. एफएसआय आणि चटई क्षेत्र (FSI and Permissible Construction)
- किती स्क्वे.फूट एफएसआय मिळतो?
- आर्किटेक्ट किंवा बिल्डिंग परवानगी विभागातून सल्ला घ्या.
9. वाटणीपत्र आणि वारसांची संमती (Partition Deed and Heirs’ Consent)
- प्रॉपर्टीवर कोणतेही वारस आहेत का?
- त्यांनी लिहून दिली आहे का की आम्हाला काही हरकत नाही?
10. सर्च रिपोर्ट (Search Report by Advocate)
- ३० वर्षांचा सर्च रिपोर्ट मिळवा.
- त्यावरून समजते की प्रॉपर्टीवर कोणी दावा करतो का?
16pur.com चा सल्ला
वरील सर्व गोष्टी तपासल्याशिवाय एकही रूपया देऊ नका. सध्या फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रांची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
16pur.com वर तुमच्यासाठी Verified प्रॉपर्टीज लिस्ट केल्या आहेत – फोटो, व्हिडीओ, Google लोकेशन लिंकसह. आमचा उद्देश आहे प्रामाणिक माहिती आणि सुरक्षित व्यवहार.
तुम्ही अजून कोणत्या प्रॉपर्टी टिप्सबद्दल वाचायला इच्छुक आहात?
कमेंट करून जरूर कळवा. आणि आमचा यूट्यूब चॅनल व ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका.
www.16pur.com – सोलापूरची विश्वासार्ह प्रॉपर्टी साईट
📞 8087640953
